मा. पालक न्यायमुर्ती साहेबांचे प्राेफाईल
जन्म २८ फेब्रुवारी, १९७३. मूळचे अमरावती, विदर्भ विभाग (महाराष्ट्र). श्रीमती आशा आणि कै. ॲड. एस. झेड. पाटील यांचे पुत्र. त्यांचे वडील डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय, अमरावतीचे माजी माननीय प्राचार्य आणि विधी विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता होते. त्यांनी जिल्हा न्यायालयात तसेच उच्च न्यायालयात वकील म्हणून काम केले. त्यांनी अमरावती येथील मणिबाई गुजराती हायस्कूलमधून शालेय शिक्षण (एसएससी) पूर्ण केले. १९९६ साली नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातून पाच वर्षांचा विधी अभ्यासक्रम पूर्ण केला.
दिनांक १०/४/१९९७ रोजी महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून नोंदणी केली. त्यांनी उच्च न्यायालय, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण आणि शालेय न्यायाधिकरण येथे मोठ्या प्रमाणावर वकिली केली आहे. ते शैक्षणिक प्रकरणे, सेवा प्रकरणे, निवडणूक प्रकरणे, महसूल प्रकरणे आणि सार्वजनिक विश्वस्त प्रकरणांशी संबंधित खटल्यांमध्ये विशेषज्ञ आहेत. जनहित याचिकेत विना-शुल्क हजर राहिले. २७ जानेवारी २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.